रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (14:04 IST)

छेद्दू यांचे उपमुख्यमंत्री मौर्य यांना आव्हान, प्रत्येक घरातून केवळ एक मताची मागणी

chhedu election
यूपीच्या कौशांबीची हॉट सीट असलेल्या सिरथू विधानसभेत निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असताना इथे राजकारणातील बडे नेते डेप्युटी सीएम मौर्य यांना आव्हान देत आहेत. अशात त्यांच्यासमोर अपक्ष उमेदवारही अडचणीचे ठरतं आहेत.

सिरथूच्या अपक्ष उमेदवारांमध्ये छेद्दू यांचे देखील नाव येते. छेद्दू यांच्या प्रचार करण्याची पद्धत मात्र अतिशय अनोखी आहे. ते आलिशान वाहनातून प्रचार करत नाहीये तर सायकलवरून प्रचार करत आहेत. ते डुग्गुगी वाजवून केवळ एका घरातून एकच मत देण्याचे आवाहन जनतेला करत आहे.

छेद्दू यांनी आतापर्यंत क्षेत्र पंचायत ते लोकसभेपर्यंत 10 निवडणुका लढवल्या आहेत. यावेळी ते उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासमोर सिरथू विधानसभेतून 11 वी निवडणूक लढवत आहेत.
 
छेद्दू सिरथू विधानसभेची ग्रामसभा शमशाबादच्या तैबापूर गावचे रहिवासी आहे. ते ग्रामीण व शहरी भागात सायकल चालवून भांडी विकण्याचे काम करतात. मात्र त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असल्यामुळे ते लोकसभा असो वा विधानसभेची, जिल्हा पंचायतीची असो वा क्षेत्र पंचायत सदस्याची कोणतेही निवडणूक असो ते दोन दशकांपासून प्रत्येक निवडणुकीत भाग घेत आहेत.