आर.आर पाटलांच्या उमेदवारीवर भाजपचा आक्षेप
राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आर.आर. आबांचा उमेदवारी अर्ज तूर्तास बाजूला ठेवण्यात आला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर याच मतदारसंघातून भाजपने अजित घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आर.आर.पाटील यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात बेळगावमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा उल्लेख केलेला नसल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज छाननी सुरु आहे. त्यामुळे काही वेळाने पुन्हा छाननी केल्यानंतर आर आर पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.