शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (17:01 IST)

केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचे शिवसेनेचे संकेत

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजप याच्यातील  25 वर्षे जुनी मैत्री तुटल्यानंतर आता केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचे शिवसेनेने संकेत दिले आहेत. शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय अवजड मंत्री अनंत गिते यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतून परतल्यानंतर गिते त्यांच्याकडे राजीनामा देतील अशी माहिती खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
 
खुद्द उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिल्याने महाराष्ट्रातील युती तुटल्यानंतर आता केंद्रातील शिवसेना आणि भाजपमधली युती तुटल्यात जमा आहे.