शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: बीड , गुरूवार, 25 सप्टेंबर 2014 (10:26 IST)

परळीतून पंकजा मुंडेविरुद्ध धनंजय मुंडे लढत?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि आमदार पंकजा मुंडे या आज परळीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार धनंजय मुंडे हे उमेदवारी अर्ज भरणार आहे. यामुळे पंकजा मुंडे ‍विरूद्ध धनंजय मुंडे अशी लढत पाहायला मिळणार आहे. 

बीडचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, महसूल राज्यमंत्री सुरेश धस तर आष्टीतून भाजपचे भीमराव धोंडेही उमेदवारी अर्ज दाखल करतील. माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. गेवराईत भाजपतर्फे लक्ष्मण पवार शुक्रवारी तर आमदार बदामराव पंडित शनिवारी अर्ज भरणार आहेत.