शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 24 सप्टेंबर 2014 (16:38 IST)

युती टिकली मात्र महायुती फुटण्याची शक्यता

शिवसेना-भाजपची युती कायम असली तरी महायुती फुटण्याची दाट शक्यता आहे. तीन घटकपक्ष बुधवारी सायंकाळी युतीतून बाहेर पडणार असल्याची माहिती रासपचे प्रमुख महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
 

भाजप-शिवसेनेने आमचा भ्रमनिरास केला आहे. गोड बोलून आमचा वापर केला आहे. तसेच युती होताच आमच्या पाठीत गंजीर खुपसल्याचा आरोप माधव जानकर यांनी केला आहे. भाजपने आपल्या जागा वाढवून घेण्याकरिता आम्हाला खेळवत ठेवल्याचा आरोप खोत यांनी केला आहे. शिवसेना-भाजपने जागावाटपांत महायुतीतील घटकपक्षांना केवळ 7 च जागा देऊ केल्या आहे. त्यामुळे घटक पक्ष नाराज झाले आहे. घटकपक्षांची सकाळी 11 वाजता मुंबईत बैठक झाली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर व शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे हे हजर होते.

महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांनी दिली. आज सायंकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करू असेही त्यांनी सांगितले.

खोत म्हणाले, आम्ही महायुतीतून बाहेर पडत आहोत. आज सायंकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करू. त्याचबरोबर आम्ही तीन घटकपक्ष आगामी निवडणुकीला एकत्र सामोरे जाऊ. त्याची पहिली यादी आज सायंकाळी आम्ही सादर करणार आहे. नव्हता.