मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 18 ऑक्टोबर 2014 (10:44 IST)

शिवसेना मवाळ, भाजपशी पुन्हा मैत्री?

13 व्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्‍याचे अंदाज एक्झिट पोलने दिले आहेत. मात्र, भाजपला स्पष्‍ट बहुमत म‍िळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष ठरणार असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना मवाळ झाला असून जुन्या मित्राशी पुन्हा मैत्री करण्याचे संकेत शिवसेनेने दिल्याचे समजते.

'मने दुभंगली आहेत. दुभंगलेली मने पुन्हा जुळणे अवघड असले तरी महाराष्ट्राला स्थैर्य शांतता हवी आहे. त्यामुळे आता वादविवाद वा कडवटपणा कायम ठेवण्याची गरज नाही. आपण आता मतमोजणीच्या दिवसाची प्रतीक्षा केली पाहिजे', असे शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'मधून म्हटले आहे.

बदलत्या परिस्थितीत शिवसेनेने मवाळ भूमिका घेण्याचे संकेत दिल्याने ‘दुभंगलेली मने पुन्हा जुळण्या’ची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा प्रचारकाळात शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर कडवट शब्दांत टीका केली होती.