शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (10:09 IST)

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवतोच- उद्धव ठाकरे

शिवसेना-भाजपची 25 वर्षे जुनी मैत्री माझ्यामुळे नव्हे तर  भाजप नेत्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे तुटली, अशी घणाघाती टीका  ‍शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच शिवसेनेचा  मुख्यमंत्री बनवून दाखवतोच असे आव्हानही भाजप नेत्यांना दिले.

मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडला.  यावेळी सेना-भाजपमधील युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी  पहिल्यांदा आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव म्हणाले, भाजपने केवळ युती तोडली नसून हिंदुत्त्वाशी नाते  तोडले आहे. मात्र महाराष्‍ट्रातील जनता त्यांना माफ करणार  नाही. मी मुख्यमंत्रीपदासाठी युती  तोडली असा आरोप असेल तर  जागा वाढवून का मागत होते. भाजपला 18 जागा वाढवून  दिल्या तरी ते 135 जागांवर ठाम होते. परंतु त्यांना आणखी  जागा वाढवून देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना एकदम टोकाची  भूमिका घेतली आणि खापर माझ्याच डोक्यावर फोडले.भाजपने  युतीच तोडली नाही तर हिंदुत्त्वाशीही नाते तोडले असेल्याची टीका  उद्धव यांनी केली.

मात्र, शिवसेना हिंदुत्त्व सोडणार नाही. सेनेने ‍भाजपचे दिवंगत  नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या  विरोधात परळीतून उमेदवार उभा केलेला नाही.