शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: बीड/औरंगाबाद , शनिवार, 4 ऑक्टोबर 2014 (10:30 IST)

सत्ता द्या, महाराष्ट्रातील दुष्काळ हद्दपार करतो- राज ठाकरे

देशाला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे झाली असून आपल्याला मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. राजकीय नेते मात्र जनतेला वेडे बनवत आहेत. त्यामुळे मनसेला एकहाती सत्ता द्या, दुष्काळाला हद्दपार करतो आणि महाराष्ट्राचा विकास करतो, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी केले.
 
राज ठाकरे बीड जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. घनसावंगी मतदारसंघातील मनसेचे उमेदवार सुनील आर्दड यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. 
 
दुसरीकडे, राज्याच्या राजकारणात मला राजकीय परिवर्तन घडवायचे असल्याचे राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील पैठण येथील जाहीर सभेत सांगितले. विधानसभा निवडणुकीत मला दुकान चालवण्यासाठी नाही, असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले. 
 
आता बदलत्या राजकीय घडामोडींचा फायदा उचलण्याची रणनीती राज ठाकरे यांनी आखली आहे. त्यातच मराठी अस्मिता बाजूला ठेऊन ब्ल्यू प्रिंट आणि विकासाचे मुद्दे पुढे आणले आहेत.
 
मनसेच्या ब्लू प्रिंटकडे अनेकांनी दूर्लक्ष केले. परंतु ब्लू प्रिंटमधील मुद्दे प्रत्यक्षात उतरवण्यात अपयशी ठरलो ठरलो तर पुन्हा मत मागायला येणार नाही, असेही राज ठाकरे यांनी जाहीर केले. पैठण विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार डॉ.सुनील शिंदे यांच्या प्रचारार्थ राज आले आहेत.