गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विंदा करंदीकर
Written By वेबदुनिया|

दिन विशेष : विंदा करंदीकर

WD
‘देणार्‍ाने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे, तुडुंब भरलीस मातृत्वाने, काजळ वाहवले गालावर, मोहोर गळला मदिर क्षणांचा, कुणी प्रगटली निवले अंतर’ अशांसारख्या एकाहून एक सरस कविता लिहिणार्‍या कवी विंदा करंदीकरांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी घालवल, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे झाला.

इंग्रजीचे प्राध्यापक असणार्‍या विंदांनी ‘स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका, संहिता’ असे कवितासंग्रह तर ‘राणीचा बाग, परी ग परी, सर्कसवाला’ यासारखे बालकवितासंग्रह दिले. पण विंदा आठवतात ते वसंत बापट आणि पाडगावकरांसह त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या काव्यवाचनामुळे. दर्जेदार मराठी कवितांना घरे मिळवून देण्याचा हा अफाट यशस्वी प्रयोग होता. मार्क्स आणि गांधीवादावर अढळ निष्ठा असणार्‍या विंदांनी पुरस्कारापोटी मिळालेले लक्षावधी रुपये सामाजिक संस्थांना देऊन
‘देणार्‍याने देत जावे’ चा अनुभव रसिकांना दिला. विंदा ‘मानवाचे अंती गोत्र एक’ हे जसे लिहितात तसे ‘सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी’ अशी भावगीतेही लिहितात.