बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विंदा करंदीकर
Written By भाषा|

साहित्य संमेलनात होते विंदांचे काव्यवाचन!

WD
WD
आपले सबंध आयुष्य साहित्यासाठी अर्पण केलेल्या विंदांचे आज (ता 14) दु:खद निधन झाले. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना साहित्याचाच ध्यास होता. आपल्या वयाच्या 92 व्या वर्षी रुग्णालयात असलेल्या विंदांनी पुण्यात होणाऱ्या साहित्य संमेलनातील उद्घाटन सत्रात काव्य वाचन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांची ही काव्य वाचनाची इच्छा अपूर्णच राहिली.

विंदांनी नुसतीच साहित्य रचना केली नाही, तर ते लिहीत असलेले साहित्य जगले अशा शब्दात अनेक मान्यवर साहित्यिकांनी त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे.

विंदांनी नुसत्याच कविता लिहिल्या नाहीत तर आपल्या जीवनात त्याचा आनंदही घेतल्याचे मत प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या कवितांचा कॅन्व्हॉस खूपच व्यापक असल्याची प्रतिक्रियाही म्हात्रे यांनी दिली आहे.

विंदांना केवळ मराठी कवी म्हणणे चुकीचे असून, ते जागतिक पातळीवरील मोठे कवी होते अशी प्रतिक्रिया 2008 मधील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध हिंदी कवी कुंवर नारायण यांनी दिली आहे.

विंदांच्या लेखनात नावीन्य होते. त्यांनी केवळ गंभीर लिखाणंच केले नाही तर लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या कविताही प्रसिद्ध झाल्याचे ते म्हणाले. विंदांच्या निधनाने मराठी साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे मत ज्येष्ठ कवी चंद्रकांत देवताळे यांनी व्यक्त केले आहे.