Veer Savarkar, Aajkal, Maharashatra, Hindutva | अनादी मी, अनंत मी अवध्य मी
- कै. आचार्य बाळाराव सावरकर
|
बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सन 1906 मध्ये 23 व्या वर्षी ते इंग्लंडची राजधानी लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेले. तेथे त्यांनी इटलीचे रामदास जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र लिहिले. तसेच 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर हे ही पुस्तक लिहिले. ही पुस्तके वाचणारा वाचक देशभक्त बनेल, आपले राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करील या भीतीने इंग्रज सरकारने ही पुस्तके छापण्यास आणि वाचण्यास बंदी घातली. ही पुस्तके छापण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे थोरले बंधू क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांस ब्रिटीश सरकारने जन्मठेप व काळेपाण्याची शिक्षा दिली. या शिक्षेचा सूड घेण्यासाठी मदनलाल धिंग्रा यांनी भर लंडनमध्ये कर्झन वायली या इंग्रज अधिकार्यास सन 1909 मध्ये गोळी घालून ठार मारले. त्याच्या पाठोपाठ नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरे या तरुणाने गोळी घालून वध केला.
जॅक्सनला मारण्यासाठी वापरले गेलेले पिस्तूल सावकरांनी पाठविलेले होते असे समजून ब्रिटीश सरकारने लंडनमध्ये सावकरांना पकडले आणि भारतात पाठविले. भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस या सिंधूद्वाराजवळ नौकेतून समुद्रात उडी मारली! आणि ते ब्रिटीश शिपायांनी त्यांच्यावर झालेल्या बंदुकीच्या गोळ्या चुकवत पोहत पोहत फ्रान्सच्या किनार्यावर पोचले. ब्रिटीश पोलीसही त्यांच्या पाठोपाठ होडीतून तेथे पोचले आणि त्यांनी सावरकरांना पकडून पुन्हा बोटीवर आणले! आणि त्यांना मारण्याच्या धमक्या देऊ लागले. तेव्हा सावरकरांनी त्यांना सांगितले मला हात लावाल तर लक्षात ठेवा माझे मित्र तुम्हाला सोडणार नाहीत, तेथे त्यांनी कविता रचली 'अनादी मी, अनंत मी अवध्य मी भला। मारिल रिपु कवण असा जगती जन्माला?
