शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

''वारकरी संप्रदायात कोणीही येऊन ईश्वरप्राप्ती करू शकतो''

महाराष्ट्राचे धार्मिक आणि सांस्कृतिक व्यक्तित्वाचे धनी, आदरणीय ज्ञानेश्वर महाराज मराठी संत आणि कवी होते. यांचा जन्म तेराव्या शताब्दीत, श्रावण कृष्ण अष्टमीला  महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचे आपेगाव येथे झाला होता. ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलपंत आणि रखुमाबाई (रुक्मिणीबाई कुलकर्णी) यांच्याकडे एक देशस्थ ब्राम्हण कुटुंबात जन्मेल होते. यांचे मूळ नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी होते पण लोकं यांना ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, माउली किंवा ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी असेही म्हणायचे. ह्यांनी संत नामदेव सारख्या आणखीन लोकांना धर्माबद्दल कार्य करायची प्रेरणा दिली. हे वारकरी परंपरांचे संस्थापकांपैकी एक आहे.
 
नाथ संप्रदाय, वैष्णव संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय काही म्हणा आशय सगळ्याचा एकच आहे, अर्थात देव विठ्ठलाची भक्ती करत असले लोकं. संत नामदेव महाराजांसोबत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार केला. वारकरी संप्रदायात कोणीही येऊन ईश्वरप्राप्ती करू शकतो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणत असे आणि तेव्हापासूनच वेग-वेगळ्या संप्रदायाच्या लोकांनाही वारीमध्ये सामील होण्याची आणि विठ्ठलाचे वारकरी व्हायची संधी मिळाली.  
 
ज्ञानेश्वर महाराजांनी एक मराठी ग्रंथाची रचना केली ज्याच्यात श्रीमद्भगवदगीताची भावार्थ रचना आहे. हा ग्रंथ आज ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका या नावाने ओळखला जातो. त्यानंतर त्यांनी आपले गुरु आणि मोठे भाऊ निवृत्तीनाथ महाराज यांच्या सल्ला घेत "अमृतानुभव" किंवा "अनुभवामृत " नावाची रचना केली जे एका प्रकाराचे आत्मसंवाद आहे. ग्रंथ "चांगदेवपासष्टी" हे यांनी चांगदेव महाराजांना त्यांच्या पत्राचे उत्तर देण्यासाठी लिहिले होते, जे एका प्रकारचे ज्ञानोपदेश आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक अभंग ही लिहिले आहे.
 
विठ्ठलाची भक्ती असो किंवा धार्मिक चेतना, लोकांना आत्मज्ञान द्यायच असो किंवा मार्ग दाखवण्याच्या गोष्टी, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या लहान आयुष्यामध्ये खूप मोठे कार्य केले आहे ज्यामुळे लोकं आजही त्यांची आठवण ठेवून त्यांच्या मार्गावर चालतात.
 
अमृतानुभव या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. २१ वर्षाचे आयुष्यानंतर शेवटी १२९६ मध्ये कार्तिकच्या शेवटच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे समाधी घेतली. दर वर्षी आषाढी देवशयनी एकादशीला आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराजांची वारी पंढरपूरला निघते आणि वारकरी नाचून, अभंग गाऊन ज्ञानेश्वर महाराजांचा जयघोष करत पंढरपूर गाठतात.