मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

विठ्ठलाचे वारकरी

दर वर्षी देवा विठ्ठल/विठोबा किंवा पांडुरंग यांचे भक्त पंढरपूरला यात्रा करतात ज्याला 'वारी' म्हणतात. 'आषाढ' आणि 'कार्तिक' मासमध्ये असं दोन वेळा पंढरपूर वारी ही केली जाते.
 
आषाढी वारी :- या वारीमध्ये सर्व संतांच्या पालख्या आपल्या गावाहून पंढरपुरात येतात. कार्तिकी वारी :- या वारीमध्ये संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपल्या गावाला जातात. वारीमध्ये लोकं विशेषकर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका घेऊन यात्रा करत पायवाटाने पंढरपूर जातात. धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा वारी करायची ही परंपरा महाराष्ट्रात सुमारे ८०० वर्ष जुनी आहे.
 
वारीबद्दल तर आपण जाणलं पण 'वारकरी' हे कोण असतात, यांचे कार्य काय असतात आणि काय-काय नियम, पद्धती ते पाळतात? हे माहित आहे का ? चला जाणून घेऊ या 'वारकरी' यांच्याबद्दल.
 
वारकरी शब्द हे दोन शब्दाचे मेळ द्वारे बनलेला आहे 'वारी' म्हणजे यात्रा आणि 'करी' म्हणजे कार्य करणारी व्यक्ती, म्हणजे यात्रा करता किंवा यात्रा घेऊन जाणारे भाविक. 
 
वारकरी ही एका प्रकारची संप्रदाय आहे ज्या महाराष्ट्राचे काही भागात अजूनही प्रचलित आहेत. हे महाराष्ट्राचे आणि उत्तरी कर्नाटकचे हिंदू लोकांची परंपरा आहे. भक्ती आंदोलनाचे प्रमुख संत आणि गुरुजन, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, चोखामेळा महाराज, हे सगळे वारकरी परंपरांशी जोडलेले होते आणि त्यांना 'संत' जणांची उपाधी दिली गेली. वारकरी देवा पांडुरंग आणि देवी रुखमणी यांना पूजतात. वारीसह संतांची पादुका घेऊन जाण्याची परंपरा संत तुकाराम महाराजांच्या सर्वात लहान अपत्य नारायण महाराजांनी १६८५ साली मध्ये सुरु केली होती. कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी "पंढरीनाथ महाराज की जय", "माउली ज्ञानेश्वर महाराज की जय, "जगतगुरु तुकाराम महाराज की जय", असे जयघोष केले जातात. 
 
वारकरी गळ्यात तुळशीमाळ घालतात आणि त्याच्याने सतत जप करत असतात कारण ती माळ त्यांना देवा पांडुरंगाचे विस्मरण होऊन देत नाही आणि तुळशीमाळ घातली नाही तर वारी पूर्ण होत नाही असे मानले जाते. वारकरी परंपरांचे आणखीन काही महत्वपूर्ण कार्य असतात जसे नित्य नियमाने अंघोळ करून गोपीचंदनाचा टीका लावणे (वारकरी पंढरपूर पोहोचल्यानंतर पण चंद्रभागाचे पाण्याने स्नान करतात), पांडुरंगाचे जप करणे, देवाचे दर्शन करणे, भक्ती गीत व अभंग गाणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकादशीचे व्रत पाळणे.
 
रिंगण आणि धावा:- रिंगण आणि धावा हे दोन सोहळा खूप महत्वाचे असतात.
 
रिंगण :- एका मोकळ्या मैदानात गोलाकार बनवून पहिले वारकरी त्यात धावतात, नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो, याला आदराने "माउलीचे अश्व" असे ही म्हणतात. या घोड्यावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज स्वार होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.
 
धावा :- असे मानले जाते जेव्हा तुकाराम महाराज पंढरपूर जात असे तेव्हा त्यांना छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाचे दर्शन झाले आणि तिथून ते पंढरपूरपर्यंत धावून गेले होते. आज त्याच स्मरणामध्ये वारकरी बेलापूरहून पंढरपूरपर्यंत धावून जातात.
 
४ महिन्यांच्या ह्या काळात वारकरी सगळे भेद सोडून, सामाजिक जीवनाला न बघता देवाला परम सत्य समजून त्यांच्या भक्तीमध्ये लीन होऊन जातात. त्या देवा पांडुरंगाला पूजतात, त्यांच्या भक्तीमध्ये गीत, अभंग गातात आणि एकासमोर वाकून नमन करतात कारण "सगळे ब्रम्ह आहात" असा त्यांच्या विश्वास असतो.