गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (11:52 IST)

यंदाची पंढरपूर वारी निर्बंधमुक्त!

vari
पंढरपूर : कोरोनामुळे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या दोन वर्षांपासून भाविकांच्या दर्शनाला बंदी होती मात्र, या वर्षी पालखी सोहळा कोरोना निर्बंधमुक्त होणार आहे. यंदा 15 लाख भाविक पंढरपुरात जमतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी 25 कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचे वृत्त आहे. तसंच वारीसाठी अधिकच्या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती ही मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 
 
अजित पवार यांच्या उपस्थितीत वारीच्या नियोजनाबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री तसेच आळंदी, देहू आणि पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष उपस्थित होते.