विठ्ठला तुझ्या भक्तांना शिस्त फार भारी
विठ्ठला तुझ्या भक्तांना शिस्त फार भारी,
शिस्तीत चालते माऊलीची पंढरीची वारी,
भावाचा भुकेला असतो प्रत्येक वारकरी,
पाण्या पावसाची भीती तो जराही न करी,
थकत नाही पाय त्याचे, वारीत चालता,
तहान भुकेची काळजी कधीच न बाळगता,
नेम वारीचा सहसा नाही चुकवितो तो,
साधभोळा वारकरी सदैव वारीत दंग होतो,
रंगात भक्ती च्या रंगून, तो वाटचाल करतो,
जाहले दर्शन विठुरायाचे, की धन्य धन्य होतो.
पुरते वर्षभर ऊर्जा दर्शनाने मिळालेली,
करतो कष्ट वर्षभर,खातो भाकर कष्टानं कमावलेली!
.....अश्विनी थत्ते.