1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
  4. chandrabhagechya teeri lyrics Marathi abhang

चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी

vitthal
चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
कधी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटी
पाहून सेवा घर, थांबला हरी तो पाहे विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी || १ ||
 
नाम देव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगला
टाळ घेउनी तरी, चला वारकरी, तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी || २ ||
 
संत जनाई ओवी गाई, विठाई ग विठाई
माझी पंढरीची आई, कशी सखू अन बहिणाबाई
विठाई ग विठाई, माझी पंढरीची आई,
रखुमाई मंदिरी ऐकली परी तो पहा विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी || ३ ||
पुढील लेख
चातुर्मासात 5 नियम पाळा आणि 5 प्रकारचे दान करा प्रत्येक इच्छा पूर्ण होईल