सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (16:01 IST)

दर्शन झालं विठुचे, पावला तो हरी

धन्य धन्य असें ते पंढरपूर,
जिथं विठू नामाचा गजर,
उभा असे, सावळा विटेवरी,
दिंड्या घेऊन निघे भक्तांची सवारी,
एक एक वारकरी, विठोबाचे रूप,
कोण देव कोण भक्त, झाले एक स्वरूप!
ह्याच भावाचा आहे तोही वेडा फार,
भक्त ही माऊली चा, पाही रूप निर्गुण निराकार,
नदीचा काठ पहा गेला भक्तीत बुडून,
वारकरी भोळा माझा गेला नादात रमून!
मनोमनी सुखावला प्रेमे वारकरी,
दर्शन झालं विठुचे, पावला तो हरी,
भक्तीचा हा पूर, ओसंडून वाहे भारी,
भक्त झालासे हरीचा, अन भक्ताचा श्रीहरी!
...अश्विनी थत्ते