बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. फ्लॅशबॅक 2022
Written By

2022 चे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट Best Marathi Movies Of 2022

मराठी फिल्म इंडस्ट्री हळुहळू आपली जागी बनवता दिसत आहे. तमिळ आणि तेलुगू सिनेमांप्रमाणेच बॉलिवूडचे दिग्गज आज मराठी सिनेमांची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनयात पाऊल टाकत आहेत. इंडस्ट्री दरवर्षी शेकडो चित्रपटांची निर्मिती करते तर त्यातून 2022 च्या खास चित्रपटांची यादी आम्ही येथे सादर करत आहोत ज्यांनी या वर्षी धमाल केली.
 
1 मी वसंतराव
कलाकार: राहुल देशपांडे, अमेय वाघ, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकरनं, सारंग साठ्ये, कुमुद मिश्रा, अलोक राजवाडे, कौमुदी वाळोकर, दुर्गा जसराज, शकुंतला नगरकर, यतिन कार्येकर
हा चित्रपट दिग्गज वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट आहे आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रवास, त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार यातून दाखवण्यात आले आहे.
mi vasantrao
2 गोदावरी
कलाकार: नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, संजय मोने, सानिया भंडारे
गोदावरी नदीच्या काठावर राहणार्‍या कुटुंबातील तीन पिढ्यांमधील संघर्ष, वैचारिक मतभेद आणि त्यांच्यातील नातं, तसेच संस्कृती दाखवून देणारा सिनेमा. 
godavari
3 एकदा काय झालं
कलाकार: सुमीत राघवन,उर्मिला कानेटकर, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी,पुष्कर श्रोती
एकदा काय झालं गोष्टीतून प्रबोधन करू इच्छिणाऱ्या आणि मुलांना नवा विचार देणाऱ्या किरण या शिक्षकाची ही गोष्ट आहे. गोष्टी गुंतागुंतीच्या होतात कारण त्यांच्यासमोरील अडथळे केवळ प्रेमाने आणि कठोर परिश्रमाने पार करता येत नाहीत. नजीकच्या नशिबाला तोंड देताना धीर देणारी एक आंतड्याची कथा आहे.
4 पांघरूण
कलाकार : गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेख तळवलकर
वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या जीवन साथीदारबद्दल संसार करताना होणारी घालमेल आणि संसारिक प्रवास दाखवणारी विलक्षण प्रेम कहाणी.
panghrun
5 बाल भारती
कलाकार : उषा नाईक, रवींद्र मंकणी, अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, संजय मोने, आर्यन मेंघजी
बालभारती ही एका पिता-पुत्र जोडीची कथा आहे जी इंग्रजी प्रवीणतेच्या कमतरतेमुळे आत्म-संशयाच्या दलदलीत अडकतात. आपल्या मुलाला भविष्यासाठी तयार करण्याच्या धडपडीत, वडील आणि संपूर्ण कुटुंब काही मौल्यवान धडे शिकतात.
bal bharti
6 सनी
कलाकार : ललित प्रभाकर, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे, पार्थ केतकर
या चित्रपटात घरापासून दूर राहिलेल्या व्यक्तींची कहाणी असून एक बड्या घरातील मुलगा सनी दादाच्या हट्टापायी परदेशात राहतो आणि आयुष्य जगण्याची शिकवण मिळवतो.
sunny
7 आपडी थापडी
कलाकार: श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधव, खुशी हजारे, संदीप पाठक, ऋतुराज शिंदे
सामान्य लोकांच्या साध्या गोष्टी दाखविणारा तसेच निरागस भावविश्व मांडणारा हा चित्रपट आहे.
8 रूप नगर के चीते
कलाकार : करण परब, कुणाल शुक्ल, सना प्रभू, मुग्धा चाफेकर, अक्षय केळकर, हेमल इंगळे
रूप नगर के चीते ही दोन मित्रांची गोष्ट आहे. दोघांमधील मैत्री कशामुळे संपते? आणि कशामुळे त्यांच्या मैत्रीला नवे धुमारे फुटतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 
9 अनन्या
कलाकार : अमेय वाघ, चेतन चिटणीस, ऋता दुर्गुळे, ऋचा आपटे, योगेश सोमण, सुव्रत जोशी
अनन्या या शीर्षकाच्या पात्राला एका अपघातानंतर आयुष्याला सामोरे जावे लागते जिथे तिने तिचे दोन्ही हात गमावलेले असतात. अपंगत्वाचा सामना करताना तिचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना, तिला काही असं सुचतं की तिचे भविष्य नव्याने घडते.
ananya
10 डियर मॉली
कलाकार : गुरबानी गिल, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन
हा नातेसंबंधावर भाष्य करणारा चित्रपट आहे. वडील आणि मुलीच्या नात्यातील अव्यक्त प्रेम यात पाहायला मिळत आहे.
dear molly