शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (19:45 IST)

योगा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा शारीरिक समस्या उद्भवू शकतात

चांगले आरोग्य आणि निरोगी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचे आहे.योगामध्ये असे बरेच आसने आहेत जे प्रत्येक प्रकाराच्या शारीरिक समस्येवर उपचार करण्यात सक्षम आहेत. पण कोणत्याही आसनाचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्या आसनाला प्रक्रियेनुसार योग्यरीत्या करावे. जर आपण कोणत्या ही नियमाला न जाणता मनाने योग करण्याचा प्रयत्न केल्यावर आपल्या शरीरास हानी होऊ शकते. म्हणून आवश्यक आहे की योगाचा योग्य फायद्या घेण्यापूर्वी ह्याची प्रक्रिया आणि या संबंधित  खबरदारी घेणं आणि समजून घेणं महत्त्वाचे आहे.
 
* सोप्या आसनापासून सुरू करा -   
जर आपण प्रथमच योगासन करतं आहात तर चुकून देखील कोणत्याही कठीण आसनाने योगाची सुरुवात करू नये. आपण योगा करण्यापूर्वी हलकं वॉर्मअप करावे.नंतर एखाद्या सोप्या आसना पासून योगाची सुरुवात करावी. जर सुरुवातीलाच कठीण आसन केले तर आपल्या स्नायूंमध्ये ताण येईल ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.
 
* आसन करताना मध्ये पाणी पिऊ नये-
जर आपण योगासन करण्याच्या दरम्यान पाणी पिऊन घेता तर आपण नक्कीच आजारी पडू शकता.सर्दी-पडसं,ताप,खोकला सारखे त्रास सहजपणे होऊ शकतात. योगा केल्याने शरीरातील तापमान वाढतो त्या मुळे तहान लागते परंतु या दरम्यान पाणी पिणं योग्य नाही. असं केल्याने शरीरावर उलट प्रभाव होऊ शकतात. योगा करण्याच्या 15 मिनिटा नंतरच पाणी प्यावं.
 
* स्वतः तज्ज्ञ बनू नका-
जर  एखादे असे आसन जे या पूर्वी आपण कधीच केले नाही तर अशा आसनांना कोणत्याही तज्ज्ञां शिवाय करण्याचा प्रयत्न करू नका. कारण प्रत्येक आसन करण्याची एक प्रक्रिया असते, जर आपण त्या प्रक्रियांचा पालन करतं नाही तर शक्यता आहे की आपण स्वतःला काही हानी पोहोचवू शकता. आपल्या सांध्यात बऱ्याच काळ वेदना होऊ शकते. 
  
* मोबाइल वर लक्ष नसावे- 
जेव्हा आपण योगासन करता तर आपला फोन बंद असावा. अन्यथा आपले लक्ष वारंवार त्याचा कडे जाऊन श्वासावरून लक्ष जाईल. जर आपण दीर्घ श्वास योग्य  घेत नसाल तर आपले योगासन पूर्ण मानले जाणार नाही. ते योग नसून फक्त व्यायाम असेल. म्हणून योगासन करताना मोबाइल स्वतःपासून लांब किंवा बंद ठेवावा.