बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : बुधवार, 9 मे 2018 (11:51 IST)

रक्तप्रवाह सुरळीत करतील ही योगासने!

ताडासन : फुफ्फुसे उभ्या कक्षेत स्ट्रेच होतात आणि त्यांची क्षमता वाढते. प्रेग्रन्सीच्या सुरुवातीच्या टप्प्यातही या आसनाचा फायदा होतो. यात केलेल्या दीर्घ श्र्वसनामुळे रक्तप्रवाह सुधारतो.
 
त्रिकोणासन : रक्त प्रवाह सुधारतो. ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध होतो. हे आसन बद्धकोष्ठतेवर फायदेशीर ठरते. प्रेग्रन्सीतही रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी हे आसन करू शकता.
 
एकपाद राजकपोतासन : हे आसन मूत्रमार्गातील विकारांवर व कंबरेच्या दुखण्यावर फायदेशीर आहे. शरीराची ताठरता जाऊन शरीरलवचिक बनतं. तसंच रक्तप्रवाह सुधारून शरीराच्या आतल्या अवयवांची कार्यक्षमता सुधारते.
 
सर्वांगासन : सर्व शरीराची कार्यक्षमता सुधारते. तसंच याचा परिणाम श्र्वसन संस्थेवरही होतो. त्याचबरोबर पाठकण्याला ऑक्सिजन आणि रक्ताचा योग्य पुरवठा होऊन मज्जासंस्थेच्या विकारांना प्रतिबंध होतो.
 
उष्ट्रासन : या आसनामुळे गर्भाशयाला रक्ताचा योग्य पुरवठा होतो. ऑक्सिजनचे अभिसरण सुधारण्यास मदत होते. तसंच श्र्वसनाच्या विकारांवरही हे आसन फायदेशीर आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील हे आसन उत्तम कार्य करते.
 
शशांकासन : या आसनामध्ये शरीराच्या वरच्या भागाला ताण मिळून तो भाग रिलॅक्स होतो. तसंच चिंता दूर होऊन हलकं वाटतं. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.

साभार : शीतल महाजन