1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : मंगळवार, 7 मे 2024 (15:21 IST)

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

meditation
आपले मन आणि मस्तिष्क यांच्या शरीरावर जास्त प्रभाव पडतो. जर तुमचे मन आणि मेंदू आरोग्यदायी असले तर तुमचे शरीर देखील आरोग्यदायी राहते. जर तुम्ही चिंतीत असाल तर याच्या प्रभावा थेट तुमच्या हृदयावर पडतो. ज्यमुळे तुमच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पुरवठा कमी होतोत. तसेच श्वासांमध्ये देखील फरक जाणवतो. व ऑक्सिजनचे प्रमाण कमी व्हायला लागते. 
 
जर नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला तर श्वासाची गती सुधारते. आणि मेंदूमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे मेंदू आणि मन ताजे राहते. 
 
पादासन-  पादासन करण्यासाठी तुम्ही आपले डाव्या पायाचे गुडघे वाकवून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवावे. व दोन्ही हातांना वर नेऊन प्रणाम मुद्रांमध्ये यावे. काही वेळ याच अवस्थेमध्ये राहिल्यानंतर सामान्य अवस्थेमध्ये परत यावे. हे आसन केल्याने मानसिक तणावापासून आराम मिळतो. 
 
ध्यान- प्रत्येक दिवशी 5 ते 10 मिनिटाचे ध्यान करावे यामुळे मेंदू आणि शांत राहतो तसेच रोगप्रतिकात्मक शक्ती वाढते. ध्यान तुमच्या रक्तचापाला नियंत्रित ठेवते.तसेच शरीर रोग्यादायी बनते. तसेच रोज नियमित ध्यान केल्याने तुमचे हृदय आरोग्यदायी राहते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik