गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : बुधवार, 26 मे 2021 (13:27 IST)

रजोनिवृत्तीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज या आसनांचा सराव करा

रजोनिवृत्ती ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यात येणारी वेळ असते आणि ही वेळ खूपच अवघड असते कारण या काळात स्त्रिया बर्‍याच शारीरिक बदलांमधून जात असतात. रजोनिवृत्तीच्या दिवसात आपण स्वत: ची काळजी घेणे आणि आपल्या शरीरास शक्य तितक्या निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे. या प्रयत्नात योग आपला साथीदार बनू शकतो. हे काही योगासन करून आपण या त्रासाला कमी करू शकता. चला तर मग जाणून घ्या.
 
* सुखासन- हे आसन सर्वात सोपे आहे. सुखासन केल्याने चिडचिड कमी होते. हे करण्यासाठी मांडी घालून बसावे. पाठीचा मणका ताठ ठेवा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. 15 -20 मिनिटे या आसनात बसून राहा. 
 
* शलभासन - या मुळे शरीरात जडपणा जाणवत नाही. या साठी पोटावर झोपा. मांडीच्या खाली तळहात ठेवा. दीर्घ श्वास घेत जेवढे पायात क्षमता आहे पायाला वर करा नंतर खाली आणा. असं 6 -7 वेळा करा. 
 
* ताडासन - हे करायला देखील सोपे आहे. या साठी आपण दोन्ही पाय जवळ करून पंज्यावर उभारा. टाचांना हवेत ठेवा. हात वर नेत ताणून घ्या. बोटांना इंटरलॉक करा. आता शरीराला पूर्ण क्षमतेने वर ओढा या दरम्यान मोठा दीर्घ श्वास घ्या.