बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (17:32 IST)

मानदुखी असल्यास हा व्यायाम करावा

मान दुखणे अशी वेदना आहे जी आपल्याला सहज बसू देत नाही.सध्या सर्वत्र वर्क फ्रॉम होम सुरु आहेत.त्यामुळे तासंतास लॅपटॉप समोर बसल्याने मानेत वेदना होऊ शकतात. औषधोपचाराशिवाय आपण काही सोपे व्यायाम करून या वेदनेत आराम मिळवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या की हे व्यायाम कसे करायचे आहे. 
 
1 मान वर-खाली करा-मानेत अचानक वेदना जाणवल्यास हळू-हळू डोक्याला मागे वाकवत मान वर करा आणि 10-15 सेकंद तसेच ठेवा,नंतर मान खाली आणा आणि 10-15 सेकंद अशाच अवस्थेत राहा.असं किमान 15 ते 20 वेळा करा.असं केल्याने आपल्याला त्वरितच आराम मिळेल. 
 
2 डावीकडे -उजवीकडे मान फिरवणे-हा व्यायाम आपण बसून किंवा उभे राहून देखील करू शकता.हे करण्यासाठी सर्वप्रथम मानेला उजवीकडे वाकवा काही वेळ तसेच राहा,नंतर हीच प्रक्रिया पुन्हा डावीकडील बाजूस करावी.असं आपण आपल्या क्षमतेनुसार करा.मानेवर जास्त ताण देऊ नका.
 
3 उजवीकडे-डावीकडे बघा-उजवी कडे -डावीकडे बघणं देखील एक चांगला अभ्यास आहे. हे दररोज केल्याने मानेच्या दुखण्यात आराम मिळतो. हे करण्यासाठी मानेला सरळ ठेवा,नंतर उजवीकडे वळवाआणि 10 सेकंदासाठी एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करा.असच नंतर डावी कडे देखील करा.असं केल्याने आपल्याला आराम मिळेल आणि मानेचे दुखणे दूर होईल.