शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (20:22 IST)

पचन शक्ती कमकुवत असल्यास हे योगासन करा

सध्याच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या अनियमित जीवनशैली आणि खाण्या पिण्याचा वाईट सवयींमुळे प्रत्येक तिसरा माणूस पोटाच्या कोणत्या न कोणत्या तक्रारीने झुंजत आहे. योग्य खाण्या पिण्याचा आणि शारीरिक हालचालींच्या अभावी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पचन संबंधी त्रासाला सामोरा जावं लागत आहे. अशात दर रोज नियमाने योगासन करावे जेणे करून पचनाशी निगडित अडचणींवर विजय मिळवता येईल.
 
* कपालभाती प्राणायाम -
कपालभाती प्राणायाम करण्यासाठी गुसिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासनात बसावे आणि आपल्या तळहाताला गुडघ्यावर ठेवा. गुडघ्याला धरून शरीराला ताठ ठेवा. आपली पूर्ण क्षमता लावून सामान्यांपेक्षा थोडा दीर्घ श्वास घेत आपली छाती फुगवा. नंतर झटक्याने श्वास सोडत पोटाला आत ओढा. जसेच आपण आपल्या पोटाच्या स्नायूंना सैल सोडता, श्वास आपोआपच फुफ्फुसात पोहोचते. या प्राणायामाचा सराव केल्याने पोटाला फायदा होतो आणि अतिरिक्त चरबी कमी होते.
 
* मत्स्यासन - 
मत्स्यासन करण्यासाठी दंडासनात बसून उजव्या पायाला डाव्या पायावर ठेवून मणक्याचे हाड ताठ ठेवा हातांचा साहाय्याने मागील बाजू कोपरे टेकवून झोपा. पाठ आणि छातीवर असावी आणि गुडघे जमिनीवर टेकवून ठेवा. आता आपल्या हाताने पायाचे अंगठे धरून ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. लक्षात ठेवा की आपले कोपरे जमिनीला लागलेले असावे. हे आसन शरीराच्या थकव्याला कमी करत आणि पोटाची सूज कमी करतं. हे आसन पोट आणि ओटीपोटास उत्तेजित करून पोटातील गॅस, सूज येणे आणि अपचनास दूर करतं.
 
* धनुरासन - 
या आसनाच्या सरावामुळे बद्धकोष्ठता, पाठ दुखी, पोटाची सूज, थकवा येणं आणि मासिक पाळी सारखे त्रास दूर होतात. या आसनाच्या सरावासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा आपले गुघडे दुमडून कंबरेजवळ न्या आणि आपल्या तळ पायांना हाताने धरून ठेवा. श्वास घेत छातीला जमिनीपासून वर उचला. पायांना पुढे ओढा आता आपल्याला स्वतःला संतुलनात ठेवून समोर बघा. या आसनाला करण्यासाठी सरावाची गरज असते म्हणून हळू-हळू याचा अभ्यास करा. 15 -20 सेकंदा नंतर आपले पाय आणि छाती हळू-हळू जमिनीकडे आणा.