गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (14:45 IST)

Yogasan : या योगासनांमुळे मनाची शक्ती वाढते; या योगासनांचा सराव दररोज करा

Yogasan: These yogasanas increase the power of the mind; Practice these yogasanas daily Yogasan : या योगासनांमुळे मनाची शक्ती वाढते; या योगासनांचा सराव दररोज करा  Marathi Marathi Yoga Lifestyle Marathi
शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमितपणे योगाभ्यास करणे फायदेशीर मानले जाते. योगासनांचा नियमित सराव केल्याने आत्मविश्वास वाढतो. अलिकडच्या वर्षांत मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.लोकांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. 
योग तज्ज्ञांच्या मते, अशा धोक्यांपासून दूर राहण्यासाठी सर्व लोकांनी रोज योगासनांचा सराव केला पाहिजे. मनःस्थिती सुधारण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी, तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी आणि नैराश्यासारख्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी ते प्रभावी ठरू शकते. चला जाणून घेऊया अशा काही योगासनांविषयी जे मानसिक आरोग्य सुधारतात.
 
1 उत्तानासन योग- उत्तानासन योगाचा अभ्यास उत्तम मानसिक आरोग्य राखण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. ही एक फॉरवर्ड स्ट्रेच पोझ आहे जी संपूर्ण पाठीच्या स्नायूंवर कार्य करते, हे योगासन सामर्थ्य देते आणि लवचिकता सुधारते. उत्तानासन योगामुळे मेंदूला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा प्रवाह सुधारतो हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. उत्तानासनाच्या नियमित सरावाने चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते आणि मन शांत होते.
 
2 कोब्रा पोज- सामान्यतः पाठीच्या समस्यांसाठी फायदेशीर मानली जाते, मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकते. ध्यानधारणा, मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी आणि शरीराला आराम देण्यासाठी हा एक उत्कृष्ट योग आहे. शरीरात रक्तप्रवाह वाढवण्यासोबतच मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठीही हा योग अत्यंत फायदेशीर मानला जातो.
 
3 प्राणायामाचा सराव- दररोज प्राणायामाचा सराव करणे  मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. प्राणायामाचा सराव मेंदूला ऑक्सिजनचे परिसंचरण वाढवण्यासाठी आणि स्नायूंना आराम देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. मूड सुधारण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी प्राणायामचा नियमित सराव करण्याची शिफारस केली जाते.