गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (10:05 IST)

सैनिकाच्या छातीतून काढला न फुटलेला ग्रेनेड

chest
Author,अलेक्स बिन्ले
social media
युक्रेनमधील एका सैनिकाच्या छातीमधून न फुटलेलं ग्रेनेड काढण्यात आलं आहे. 
 
युक्रेनच्या सैनिकी वैद्यकसेवेने फेसबूकवर त्याचा एक्सरे फोटो प्रसिद्ध केला आहे. या सैनिकाच्या हृदयाच्या अगदी जवळ हे ग्रेनेड असल्याचं दिसतं.
 
तसेच, त्याच्या छातीतून ग्रेनेड काढणाऱ्या डॉक्टरांचाही फोटो या फैसबूक पेजवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 
 
या पोस्टमध्ये म्हटलं आहे, या शस्त्रक्रियेच्यावेळेस वैद्यक कर्मचाऱ्यांसाठी सैन्यातील 2 अभियंतेही उपस्थित होते. जखमी झालेल्या सैनिकाची तब्येत आता सुधारत असल्याचे यामध्ये लिहिले आहे. 
 
हे ग्रेनेड शस्त्रक्रियेच्यावेळेस कधीही फुटलं असतं, म्हणून रक्त वाहणं थांबवण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रोकोगुलेशन उपचारपद्धतीही वापरली नाही असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 
 
हे ग्रेनेड त्या सैनिकाच्या छातीत कसं गेलं हे अद्याप समजलेलं नाही. पण ते VOG ग्रेनेड असल्याचं समजतंय. ते 4 सेंमी. आकाराचे असून त्याचा 400 मीटर अंतरापर्यंत मारा करता येतो. 
 
ही शस्त्रक्रिया मेजर जनरल आंद्री वर्बा यांनी केली आहे. त्यांना युक्रेनच्या लष्करातले सर्वा अनुभवी शल्यचिकित्सक मानलं जातं. 
 
ही शस्त्रक्रिया कोठे झाली, तो सैनिक कोठे जखमी झाला हे समजलेले नाही.  
 
रशियाने युक्रेनवर आक्रमण करून आता जवळपास 11 महिने झाले आहेत. युक्रेनच्या पूर्व भागात रशियन सैन्यदलांना हटवण्यासाठी युक्रेनचं सैन्य अजूनही लढा देत आहे. 
 
व्हॅगनर मर्सनरी ग्रुपने घोषणा केलीय की, सोलेडार या युक्रेनियन शहरावर आपण नियंत्रण मिळवलं आहे. व्हॅगनर मर्सनरी ग्रुप रशियाचा लष्कराचा पॅरामिलिट्री गट आहे. मात्र, युक्रेननं रशियाचा हा दावा फेटाळला असून, सोलेडारवर अद्याप आमचाच ताबा असल्याचा दावा युक्रेननं केलाय.
 
सोलेडारवर जर रशियानं ताबा मिळावला असेल, तर रणनितीच्या दृष्टीने मोठं पाऊल ठरू शकतं. कारण या शहरात मीठाच्या खाणी आहेत, ज्यामुळे आक्रमण करणार्‍या रशियन सैन्याला युक्रेनियन क्षेपणास्त्रांपासून संरक्षित सैन्य आणि उपकरणे ठेवण्याची जागा मिळेल.
 
सोलेडार हे बाख्मुतच्या नैऋत्येला सुमारे सहा मैलांवर आहे, जिथे रशियन सैन्य सध्या त्यांच्या हल्ल्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
 
सोलेडारवर नियंत्रण मिळवल्याचं नेरेटिव्ह सुद्धा रशियासाठी उपयोगाचं ठरू शकतं.
Published By -Smita Joshi