शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (15:22 IST)

Tongue cut ग्रुपमधून काढल्याने जीभ कापली

whats app
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 28 डिसेंबर रोजी घडला. तक्रारदार दाम्पत्य व आरोपी एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत.
 
वॉट्सवॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 
 
सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने "ओम हाईट्स ऑपरेशन" या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्य ही होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अॅडमिन होते.
 
दरम्यान, त्यांनी यातील एका व्यक्तीला जो याप्रकरणात आरोपी आहे. त्या ग्रुपमधून रिमूव्ह म्हणजे काढून टाकले. या गोष्टीचा त्यांनी तक्रारदारांच्या पतीला विचारणा केली. मात्र त्यांना काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले.
Edited by : Smita Joshi