गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

CAA : अमित शाह म्हणतात, 'समर्थनार्थ 53 लाखांहून अधिक मिस्ड कॉल'

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) समर्थन देणारे सुमारे 53 लाखांहून अधिक मिस्ड कॉल आल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलाय.
  
"CAA च्या समर्थनासाठी 52.72 लाख अधिकृत मिस्ड कॉल आले. एकूण 68 लाख मिस्ड कॉल आले, मात्र त्यापैकी अनेक मिस्ड कॉल अधिकृत नंबरवरुन नव्हते, तर एकाच नंबरवरुन पुन्हा दिलेले होते," असं अमित शाह यांनी सांगितलं.
 
भाजपनं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनासाठी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत मिस्ड कॉल देऊन समर्थन देता येतं. त्यासाठी भाजपनं 8866288662 हा मोबाईल नंबरही जारी केला होता.
 
या नंबरवर मिस्ड कॉल देण्यासाठी भाजप नेत्यांनी ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आक्षेपार्ह आवाहनं केल्याचेही दिसून आले होते. त्यामुळं या मुद्द्याभोवती सोशल मीडियावर चर्चाही रंगली आहे.