गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 12 सप्टेंबर 2019 (11:19 IST)

'फेसबुक'वर राजकीय पक्षांचा 32 कोटींचा खर्च

राजकीय पक्षांच्या 6 महिन्यांच्या जाहिरात खर्चाचा लेखाजोखा 'फेसबुक'नं प्रसिद्ध केला आहे. देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी फेसबुक प्रचारासाठी 32 कोटी रुपये खर्च केल्याचं यातून समोर आलं आहे.  
 
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या फेसबुक पेजवर सर्वाधिक 4 कोटी 34 लाखांचा खर्च झाला असून त्यापाठोपाठ काँग्रेसच्या पेजवर 1 कोटी 82 लाखांचा जाहिरात खर्च करण्यात आला आहे.
 
प्रादेशिक पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 लाख 25 हजार, शिवसेनेनं 4 लाख 63 हजार, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फेसबुकवरील प्रचारावर एक दमडीही खर्च केलेली नाही.