बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (10:26 IST)

पळपुट्यांचा समाचार जनताच घेईल: शरद पवार

"सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येऊन पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्यांचा समाचार जनताच घेईल," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.  
 
नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
 
ते म्हणाले, "काहीजण चुकीच्या वाटेवर जातील, असं वाटलं नव्हतं. पण, तसं झालं आहे. आता त्याची चिंता करण्याचं कारण नाही. महाराष्ट्र हे स्वाभिमानी लोकांचं राज्य आहे. येथील लोक स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. म्हणूनच ही जनता जेव्हा मतदान करेल, तेव्हा पळपुट्यांचा नक्कीच समाचार घेईल. दिल्लीश्वरांकडून अपमानास्पद वागणूक घेऊन ज्यांनी तह केला त्यांना धडा मिळेल."
 
"राज्यात दरवर्षी 16 हजार शेतकरी आत्महत्या करत आहेत. हातचे रोजगारही जात आहेत. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली, त्यांच्या पदराखाली जाण्याचा नाही, तर त्यांच्यासोबत संघर्ष करण्याचा हा काळ आहे," असंही ते म्हणाले.