वेरोनिक ग्रीनवुड सफरचंदाचा रंग लाल असतो, हेच आपण लहानपणापासून शिकतो. खरंतर बाजारात हिरवी, पिवळसर गुलाबी, नारंगी आणि इंद्रधनुष्यी रंगाची सफरचंदंसुद्धा मिळतात. मात्र, सफरचंदांचा आदर्श रंग लालच असतो. बोलताना उदाहरणही लाल सफरचंदांचंच देतात. जसं एखाद्याचे गाल सफरचंदांसारखे लाल आहेत. मात्र, आजच्या काळात सफरचंदांचा हा लाल रंग संकटात आहे आणि हे...