गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मार्च 2022 (21:44 IST)

Happy Women's Day 2022: महिलांच्या एकट्या प्रवासासाठी ही 5 सर्वोत्तम ठिकाणे

आपण कुटुंबासह किंवा मित्रांसह सुट्टी घालवायला गेलात तर मजा द्विगुणित होते, पण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना एकट्याने फिरण्याची आवड आहे. पुरूष नेहमी मौजमजेसाठी एकटेच बाहेर पडतात, पण महिलांना सर्व गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करावे लागते. विशेषतः महिलांच्या बाबतीत सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असतो. पण काळजी करू नका, या जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे स्त्रिया न घाबरता आणि कोणतीही काळजी न करता एकट्याने फिरण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. चला तर मग ते ठिकाण कोणते आहे जाणून घेऊ या. 

1 गोवा-गोवा हे भारतातील ठिकाण आहे जिथे महिला सर्वात सुरक्षित आहेत. गोव्याचे वातावरण संपूर्ण देशापेक्षा वेगळे आहे इथले  सुंदर समुद्रकिनारे, साहसी खेळ आणि पार्ट्यांचाही भरपूर आनंद लुटता येतो.
 
2 लडाख-लडाखच्या नैसर्गिक सौंदर्याला उपमा देऊ शकत नाही. येथील लोक महिला पर्यटकांना मोकळ्या मनाने मदत करतात. गेल्या अनेक वर्षांपासून लडाखमध्ये पर्यटकांची संख्या खूप आहे आणि तरीही इथल्या सौंदर्यात कोणतीही कमतरता नाही. येथील चमकणारे तलाव आणि बर्फाच्छादित पर्वत  भारत एक समृद्ध देश असल्याची   जाणीव करून देतात.
 
3 शिलाँग-मेघालय हा महिला बहुल समाज आहे, इथल्या बाजार पेठांमध्ये सर्वात जास्त व्यवसाय महिला करताना दिसतात. इथे महिलांना  आदर दिला जातो कोणत्याही महिला प्रवाशाने येथे एकटीने फिरल्यास तिला कोणतीही अडचण येत नाही.
 
4 जयपूर -महिलांसाठी एकट्याने प्रवास करण्यासाठी जयपूर शहर हे अतिशय सुरक्षित ठिकाण मानले जाते. जयपूरमध्ये हवा महल, जलमहाल, सिटी पॅलेस, आमेर किल्ला, जंतरमंतर, नाहरगड किल्ला, जयगढ किल्ला, बिर्ला मंदिर, गोविंद देवजी मंदिर, गढ गणेश मंदिर, संघीजी जैन मंदिर यासारखी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासारखे आहे. 
 
5 पुद्दुचेरी-या शहराची खास गोष्ट म्हणजे हे शहर अतिशय आधुनिक पद्धतीने फ्रेंच शैलीत बांधण्यात आले आहे. सौंदर्यासोबतच हे ठिकाण महिला प्रवाशांसाठीही सुरक्षित आहे. एकट्या स्त्रीला मोकळ्यापणाने  हिंडताना पाहून इथल्या लोकांना आश्चर्य वाटत नाही. इथल्या ऑरोव्हिलमध्ये जगाची संस्कृती पाहायला मिळेल. इथे शांतात अनुभवायला मिळेल.