शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (22:56 IST)

मान्सूनमध्ये ओरछा हा हटके अनुभव ठरेल

मान्सूनचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही मध्य प्रदेशातल्या ओरछाला जाऊ शकता. ओरछा हे हॉट मान्सून डेस्टिनेशन आहे. वर्षभर कोरडा असणारा माळवा प्रांतातला हा भाग पावसाळ्यात नव्या नवरीप्रमाणे नटतो. नजर जाईल तिथे हिरवळ पाहायला मिळते. पावसामुळे इथली बेटवा नदी दुथडी भरून वाहू लागते आणि तिच्या किनारी वसलेली गावं मोहरून जातात. इथलेपर्वत हिरवाईने नटतात. इथे तुम्ही काही काळ निवांत घालवू शकता.
 
फक्त हिरवळ आणि धबधबेच नाही तर इतर बरंच काही इथे पाहता येतं. ऐतिहासिक किल्ले, ठिकाणं, मंदिरं, पर्यटन स्थळं असं बरंच काही आपल्याला आकर्षित करतं. जुना काळ जागवणार्या  विविध वास्तूही लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात या भागाचं सौंदर्य खूपच खुलतं. तुम्हीही पावसाच्या प्रेमात पडला असाल तर ओरछाला नक्की भेट द्या.
 
मध्य प्रदेशातल्या कोणत्याही शहरातून ओरछाला जाता येतं. ग्वाल्हेरच्या विमानतळापासून हे ठिकाण जवळ आहे. ओरछापासून 123 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणापासून तुम्ही अगदी सहज ओरछाला पोहोचू शकता. झांशी रेल्वेस्थानकावर उतरून ओरछाला जाता येईल.
मान्सूनमधला आनंद लुटण्यासाठी स्वतःच्या वाहनानेही हा प्रवास करता येईल. ओरछा हा हटके अनुभव ठरेल. 
अभय अरविंद