रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024 (08:02 IST)

धनत्रयोदशी दर्शन विशेष : पचमठा मंदिर जबलपूर

Panchmatha Temple jabalpur
सर्वांना आवडणारा सण म्हणजे दिवाळी लवकरच येत आहे. भारतात दिवाळी विशेष उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. तसेच दिवाळीचे सर्वच दिवस विशेष महत्वाचे असतात. दिवाळीत धनत्रयोदशीला देखील अनन्य महत्व आहे. अनेक जण दिवाळीमध्ये फिरायला जातात. तसेच तुम्हाला देखील फिरायला जायचे असल्यास आम्ही तुम्हाला आज एक पर्यटन स्थळ सांगणार आहोत जिथे तुम्ही धनत्रयोदशी गेलात तर नक्कीच माता लक्ष्मीची विशेष कृपा होते. 
 
पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण भारतात लाखो लक्ष्मी मंदिरे सापडतील ज्यांचे वैभव अतुलनीय आहे. तसेच भारतीय समाजमध्ये दररोज माता लक्ष्मीची पूजा केली जाते. पण धनत्रयोदशीला विशेष पूजा पाठाचे महत्व आहे. तसेच या विशेष पर्वावर तुम्ही देखील या माता लक्ष्मीच्या मंदिराला अवश्य भेट द्या. तसेच मध्य प्रदेश मध्ये माता लक्ष्मीचे असे एक मंदिर आहे. जय मंदिरातील मूर्ती दिवसातून तीन वेळेस रंग बदलते. मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये पचमठा एक मंदिर आहे. जिथे सांगितले जाते माता दिवसांतून तीन रंगांमध्ये दृष्टीस पडते. व दर्शन घेतल्यास माता लक्ष्मीची विशेष कृपा होते. माता लक्ष्मीचे हे मंदिर मध्य प्रदेशमधील जबलपुर येथे स्थित आहे. 
 
पचमठा मंदिर इतिहास-
पचमठा मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. या पवित्र मंदिराबद्दल सांगितले जाते की, याचा इतिहास कमीतकमी 1100 वर्ष अधिक जुना आहे. या मंदिराचे संरक्षण पुरातत्व विभाग करते. असे सांगण्यात येते की या मंदिराला नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने आपले सैन्य पाठवले होते पण त्याला यश आले नाही. हे मंदिर आज देखील भक्कमपणे उभे आहे. 
 
पचमठा मंदिर चमत्कारी कहाणी- 
या मंदिरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती एका दिवसात तीन वेळेस रंग बदलते. असे सांगण्यात येते की, पचमठा मंदिर हे एकेकाळी तंत्रिकांच्या साधनेकरिता विशेष केंद्रबिंदू मानले जायचे. तसेच मंदिराच्या चारही बाजूंनी श्रीयंत्रची विशेष रचना स्थापित आहे. या मंदिरात माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची मूर्ती देखील स्थापित आहे. 
 
दिवाळीला केली जाते विशेष पूजा- 
धनत्रयोदशी आणि दिवाळीतील इतर खास पर्वावर पचमठा मंदिरामध्ये विशेष पूजा केली जाते. हजारोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. तसेच धनत्रयोदशीच्या विशेष पर्वावर पंचगव्यने महाभिषेक करण्यात येतो. 
 
पचमठा मंदिर कसे जावे?
पचमठा मंदिर मंदिरापर्यंत पोहचणे सोपे आहे. पचमठा करीत मध्यप्रदेश बसेस सेवा देखील उपलब्ध आहे. तसेच जबलपूर येथे जाण्याकरिता खाजगी वाहन, रेल्वे मार्ग, बस सेवा देखील उपलब्ध आहे.