शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:09 IST)

Navratri 2022 : पाकिस्तान आणि श्रीलंकेसह जगभरात या ठिकाणी आहेत 51 शक्तीपीठे, जाणून घ्या कुठे आहे सिद्ध मंदिर

mata hinglag mandir pakistan
काही शक्तीपीठे भारताच्या शेजारील देशांमध्ये आहेत. बांगलादेशात सर्वाधिक 4 शक्तीपीठे आहेत. पाकिस्तानातील हिंगलाज, बांगलादेशातील सुगंधा देवी शक्तीपीठ, चत्तल भवानी, जेशोरेश्वरी, कर्तोयघाट शक्तीपीठ आहेत. याशिवाय नेपाळमध्ये दोन मुक्तिधाम मंदिर, गुह्येश्वरी शक्तीपीठ आहे. तर श्रीलंकेत- इंद्राक्षी शक्तीपीठ आणि तिबेटमध्ये मानस शक्तीपीठ आहे.
 
हिंगलाज मंदिर - पाकिस्तानचे हिंगलाज मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. हे शक्तीपीठ बलुचिस्तानमध्ये आहे, असे मानले जाते की पाकिस्तानच्या हिंगलाज मंदिरात माता सतीचे शीर कापण्यात आले होते. माता सतीच्या या शक्तीपीठाला 'नानी का मंदिर' किंवा 'नानी का हज' असेही म्हणतात.
 
 जैशोरेश्वरी काली मंदिर - बांगलादेशमध्ये सर्वाधिक 4 शक्तीपीठे आहेत.वर्ष 2017 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशातील जेशोरेश्वरी काली मंदिरात मातेच्या दर्शनासाठी गेले होते. पंतप्रधानांनी मातेच्या दरबारात सोन्याचा मुकुटही अर्पण केला होता.
 
मुक्तिधाम मंदिर- नेपाळमध्ये गंडक नदीच्या काठावर पोखरा नावाचे एक ठिकाण आहे, असे म्हणतात की तेथे देवी सतीच्या कानाचा बाहेरचा भाग कापला गेला होता. गंडक नदीत स्नान करून मातेच्या दरबारात जाऊन दर्शन घेतल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
 
मानसा शक्तीपीठ- मनसा देवी शक्तीपीठ तिबेटमध्ये आहे, पुराणानुसार, देवी सतीच्या डाव्या हाताच्या तळहाताचा भाग तेथे पडला होता.