गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (11:50 IST)

महालक्ष्मीचे 10 प्रसिद्ध मंदिर, दर्शन केल्याने आर्थिक समस्या दूर होतात

देवी लक्ष्मी यांना संपत्ती आणि समृद्धी देणारी देवी मानले जाते. आख्यायिका अशी आहे की आई लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पूजा केल्यानं आपले सर्व आर्थिक संकटे दूर होतात. विशेषतः दर शुक्रवारी तेथे जावं. महालक्ष्मी आणि देवी लक्ष्मीची अनेक प्राचीन आणि प्रख्यात मंदिर आहेत. आज आम्ही आपणांस त्यापैकी 10 मंदिरांची माहिती देत आहोत. चला तर मग जाणून घेऊ या कोठे आहेत ते मंदिर-
 
1 पद्मावतीचे मंदिर - तिरूपतीजवळ तिरुचिरा नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात देवी पद्मावतीचे एक सुंदर असे मंदिर आहेत. या मंदिराला 'अलमेलमंगापुरम' च्या नावाने देखील ओळखतात. अशी आख्यायिका आहे की तिरूपती बालाजीच्या देऊळातील इच्छा तेव्हाच पूर्ण होते, जेव्हा भाविक बालाजींसह देवी पद्मावतीचा आशीर्वाद घेतात.
 
2 दक्षिण भारतातील स्वर्ण देऊळ - भारतीय राज्य तामिळनाडूच्या वेल्लू जिल्ह्यात असलेले श्रीपूरमच्या तिरूमलै कोड गावातील महालक्ष्मी मंदिर. या मंदिराला दक्षिण भारतातील 'सुवर्ण मंदिर' असे ही म्हणतात. 100 एकरांवर पसरलेले हे मंदिर चैन्नई पासून सुमारे 145 किमी अंतरावर असलेल्या पलार नदीच्या काठी आहे.
 
3 पद्मनाभस्वामी मंदिर - पद्मनाभस्वामी मंदिर हे केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये असलेले भगवान विष्णूंचे प्रख्यात मंदिर आहे. पण येथून मोठ्या प्रमाणात 'लक्ष्मी ' आढळली. हे मंदिर आपल्या सोन्याच्या खजिन्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. भगवान श्री विष्णूंना अर्पण केलेल्या पद्मनाभ मंदिराला त्रावणकोरच्या राजांनी बांधले होते. याचा उल्लेख 9 व्या शतकातील ग्रंथांमध्ये देखील आहे. पण मंदिराच्या विद्यमान स्वरूपाला 18 व्या शतकात बांधले गेले होते.
 
4 मुंबईचे महालक्ष्मी मंदिर - समुद्राकाठी बी.देसाई मार्गावर वसलेले हे मंदिर खूपच, सुंदर, आकर्षक आणि कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. इतिहासानुसार या महालक्ष्मी मंदिराची स्थापना ब्रिटिश काळात झाली. त्यावेळी देवी लक्ष्मी एका कंत्राटदार रामजी शिवाजीच्या स्वप्नात दिसली आणि त्यांना समुद्रतळापासून देवींच्या 3 मुरत्या काढून देऊळात स्थापित करण्याचा आदेश दिला. या देऊळाच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन देवींच्या एकत्र मुरत्या आहेत.
 
5 कोल्हापुराचे महालक्ष्मी मंदिर - कोल्हापूर महाराष्ट्राचा एक जिल्हा आहे. येथे असलेल्या महालक्ष्मीचे मंदिर चालुक्य शासक कर्णदेव यांनी 7 व्या शतकात बांधले होते. या नंतर, शिलहार यादवांनी 9 व्या शतकात याची पुनर्बांधणी केली. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात देवी महालक्ष्मीची मूर्ती तब्बल 40 किलोची असून 4 फूट लांबीची असून सुमारे 7,000 वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते.
 
6 लक्ष्मीनारायण मंदिर - दिल्लीच्या मुख्य मंदिरापैकी एक मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर मुळात वीरसिंह देव यांनी 1622 मध्ये बांधले होते, त्या नंतर पृथ्वीसिंह यांनी 1793 मध्ये याचे नूतनीकरण केले. या नंतर 1938 मध्ये भारतातील मोठ्या औद्योगिक घराण्या बिर्ला समूहाने याचे विस्तार आणि पुनरुद्धार केले. त्या नंतर याला बिर्ला मंदिर देखील म्हणू लागले.
 
7 इंदूरचे महालक्ष्मी मंदिर - इंदूर शहराच्या मध्यभागी असलेल्या राजवाड्याचे अभिमान म्हटले जाणारे श्री महालक्ष्मीच्या संबंधात असे म्हणतात की या मंदिराला 1832 मध्ये मल्हारराव (द्वितीय) याने बनविले होते. 1933 मध्ये हे 3 मजल्याचे मंदिर होते जे आगीत भस्मसात झाले. 1942 मध्ये मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. सध्या या मंदिराचे मुंबईतील महालक्ष्मी मंदिराच्या शैलीवर नूतनीकरण करण्यात आले आहे आणि भव्य स्वरूप देण्यात आले आहे.
 
8 चौरासी मंदिर - हे मंदिर हिमाचल प्रदेशातील चंबा पासून 65 किमी लांब भरमोर जिल्ह्या नगर मध्ये आहे. इथे महालक्ष्मी सह गणेशाची आणि नरसिंह देवाची मूर्ती आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्टया खूप महत्त्वाचे मानले जाते.
 
9 चंबाचे लक्ष्मीनारायण मंदिर - हिमाचलाच्या चंबा मध्ये वसलेले हे मंदिर पारंपरिक वास्तुकला आणि शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. चंबाच्या 6 प्रमुख मंदिरापैकी हे मंदिर सर्वात मोठे आणि प्राचीन आहेत. भगवान श्री विष्णूंना समर्पित असलेले हे मंदिर राजा साहिल वर्मन ने 10 व्या शतकात बांधले. हे मंदिर शिखर शैलीत बांधले आहेत.
 
10 अष्टलक्ष्मी मंदिर - चेन्नईचा जवळ इलियट समुद्राच्या जवळ असलेले हे मंदिर सुमारे 65 फूट लांब आणि 45 फूट रुंद आहे. या मंदिरात लक्ष्मीचे आठ स्वरूप 4 मजल्यावर बनलेल्या 8 वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बनविले आहेत. या मंदिरात देवी लक्ष्मी आपल्या पती आणि भगवान विष्णूंसह मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर विराजमान आहे.