शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (10:03 IST)

Happy Birthday Ratan Tata :टाटा समूहाचे 'रत्न' यशस्वी उद्योजक रतन टाटा

Happy Birthday Ratan Tata: Tata Group's 'Ratna' Successful Entrepreneur Ratan Tata Happy Birthday Ratan Tata :टाटा समूहाचे 'रत्न' यशस्वी उद्योजक रतन टाटा  Marathi Current Affair News Biography Marathi Webdunia Marathi
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा त्यांचा 84 वा वाढदिवस साजरा करत आहेत. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी गुजरातमधील सुरत येथे झाला . ते देशातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक मानले जातात.  त्यांच्या आदर्शांमुळे ते यशस्वी आहे . 
रतन टाटा यांचा जन्म गुजरातमधील सुरत येथे 1937 मध्ये झाला होत ..त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा होते. त्यांच्या आईचे नाव सौनी टाटा होते.  नवल टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू होते. रतन टाटा यांनी वयाच्या 25 व्या वर्षी 1962 मध्ये .टाटा समूहामधून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.  नंतर त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी  ते हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेले. ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी .कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे माजी विद्यार्थी देखील होते. रतन टाटा 1962 मध्ये टाटा समूहात सामील झाले ..
अनेक कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 1971 मध्ये त्यांची राष्ट्रीय रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडचे ​​प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. जेआरडी टाटा 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले. यानंतर रतन टाटा यांना टाटा सन्सचे पाचवे अध्यक्ष बनवण्यात आले. यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीने टाटा समूहाची प्रतिमा बदलून ती उंचीवर नेली.  ..
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने एकापाठोपाठ एक यश मिळवत इतर अनेक मोठ्या कंपन्या ताब्यात घेतल्या.याच क्रमाने टाटा टीने टेटली, टाटा मोटर्स जॅग्वार लँड रोव्हरआणि टाटा स्टीलने कोरसचेही अधिग्रहण केले. त्यांनी 2008 मध्ये जगातील सर्वात स्वस्त कार 'नॅनो' डिझाइन करून लॉन्च केली. 
रतन टाटा यांना  त्यांच्या देशावरील प्रेम आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील .कठोर परिश्रमासाठी  2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण ने सन्मानित करण्यात आले.