शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दीपिकाने टाकले प्रियांकाला मागे!

बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्यात सरस कोण असा प्रश्न नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेत येत असतो. आता अमेरिकेतील नामवंत मासिक व्हॅनिटी फेअरने ‘हॉलिवूडस् नेक्स्ट जनरेशन’ ही यादी प्रसिद्ध केली असून यात दीपिकाला दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. तर प्रियांकाचा या यादीत समावेशच करण्यात आलेला नाही.
 
या यादीत आणि तेही दुसर्‍या क्रमांकावर नाव आल्याने दीपिकाची हॉलिवूडमधील वाढती क्रेझच अधोरेखित होत आहे. प्रियांकाने हॉलिवूडमध्ये ‘क्वाँटिको’ या मालिकेत काम केले आहे, तसेच बेवॉच या सिनेमातही तिची प्रमुख भूमिका आहे. याशिवाय ऑस्करसह विविध सोहळ्यांना प्रियांकाला आवर्जून आमंत्रित केले जाते. तर दीपिका सध्या विन डिझेलसोबत ‘ददद रिटर्न ऑफ झांडर केज’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
 
प्रियांका हॉलिवूडमध्ये दीपिकाच्या तुलनेत जास्त अनुभवी असली तरी दीपिकाचे नाव या यादीत आल्याने दीपिकाच्या चाहत्यांत उत्साह आहे.