शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2016 (15:42 IST)

विराटच्या घरी दिल्ली पोहोचली अनुष्का, जुळून येणार रेशीमगाठी!!

टीम इंडियाचा सुपर स्टार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्काबद्दल चर्चा गरम आहे. सुलतानच्या शूटिंगसाठी जेव्हा अनुष्का बुडापेस्ट जात होती तेव्हा विराट तिला सोडायला एयरपोर्टवर गेला होता. आता असे ऐकण्यात आले आहे की अनुष्का भारतात परतली आहे आणि आपल्या घरी मुंबईत न जाता ती सरळ दिल्लीत विराट कोहलीच्या घरी पोहोचली.   
 
असे सांगण्यात येत आहे की ती दिल्लीत विराटच्या कुटुंबीयांना भेटायला गेली आहे. अनुष्काने दिल्लीत त्याच्या घरी बराच वेळ घालवला आणि आता चर्चा ही आहे की ती विराटसोबत अजून कुठे गेली आहे. अनुष्का आणि विराट दोघेही सोबत वेळ घालवायला बरोबर गेले आहे. दोघेही कुठे गेले आहे ते त्यांच्या जवळच्या लोकांना नक्कीच माहीत असेल.  
 
आता बातमी अशी आहे की ते दोघेही लवकरच लग्न करणार आहे. दोघांच्या करियरमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरू आहे आणि आता लग्न न करण्याचे दोघांजवळ कुठलेच कारण नसावे.