सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (19:22 IST)

30 वर्षीय अभिनेता सूर्या शर्माने मानसी मोघे सोबत लग्नगाठ बांधली

surya
Instagram
टीव्ही अभिनेता सूर्या शर्मा सध्या खूप आनंदी आहे, कारण त्याने एका महाराष्ट्रीयन समारंभात मॉडेल आणि 'मिस इंडिया दिवा 2013' विजेती मानसी मोघेसोबत लग्न करून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. 
सूर्या शर्माने लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. 9 डिसेंबर 2023 रोजी अभिनेत्याने आपल्या इंस्टावर लग्नाचे दोन फोटो शेअर केले असून  या फोटोत ते दोघे पारंपरिक वेशभूषेत खूपच छान दिसत आहे. 

या जोडप्याने लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता. मानसीने लाल रंगाची पारंपरिक साडी घातली असून मॅचिंगचे ब्लाउज घातले आहे ज्यावर सोनेरी काम केलेले होते.  
तसेच सोन्याचे दागिने घातले होते. नाकात नथ घातली होती. या मराठमोड्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.  
तर सूर्या लाल रंगाची शाल बेज पगडीसह बेज रंगाचा कुर्ता -पायजमा घातलेला होता. सूर्याने शेअर केलेल्या फोटो मध्ये हे जोडपे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. त्याने या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे. ''कायमची माझी''
  
सूर्या 'अनदेखी', 'ये काली काली आँखे' आणि 'होस्टेज' मधील त्याच्या शानदार अभिनयासाठी ओळखला जातो. तर  2013 मध्ये मिस दिवाचा किताब पटकावणाऱ्या मानसीने 2014 मध्ये आलेल्या 'बुगडी माझी सांडली ग' या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. त्यांनी ऑटोग्राफ', 'यारियां 2' या चित्रपटातून आपला प्रवास पुढे नेला आणि ख्वाबोके परिंदे या वेबसिरीज मध्येही झळकली. 
 
Edited by - Priya Dixit