1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 एप्रिल 2025 (15:08 IST)

अभिनेता परेश रावल स्वमूत्र प्यायचे स्वतः केला खुलासा, यांच्या सांगण्यावरून असे केले

Paresh Rawal Drank His Urine To Recover: बॉलिवूडमध्ये बाबुराव म्हणून प्रसिद्ध असलेले परेश रावल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.त्यांनी स्वतःचे मूत्र पीत असल्याचा खुलासा केला. ते म्हणाले, हा काळ असा होता जेव्हा ते रुग्णालयात दाखल होते. घातक' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान परेश रावल यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
त्यांना गुडघ्याचा त्रास असून त्यावर उपचार सुरु होते. या काळात अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांनी त्यांना स्वमूत्र पिण्याचा सल्ला दिला .परेश रावल यांनी एका मुलाखतीत स्वतःबद्दल अनेक खुलासे केले.

ते म्हणाले, वीरू देवगण साहेब आले होते. त्यावेळी मी नानावटी रुग्णालयात दाखल होतो. ते कोणाला तरी भेटायला आले होते. जेव्हा त्यांना कळले की मी इथे आहे, तेव्हा ते मलाही भेटायला आले. त्यांनी मला विचारले की तुम्हाला काय झाले आहे? मी म्हणालो, मी पडलो होतो साहेब. त्यांनी विचारले- कसे आहात? तर मी म्हणालो की आता 3-4 दिवस झाले आहेत. तर त्यांनी सांगितले- मी जे सांगतो ते तुम्ही कराल का? मी विचारले काय, तर त्यांनी म्हटले- तुम्ही कराल का? मी म्हणालो हो मी करेन साहेब, मला सांगा. मग त्यांनी सांगितले- सकाळी उठल्यानंतर, सर्वप्रथम स्वतःचे  मूत्र प्या."
परेश रावल म्हणाले, हे ऐकून मला धक्काच बसला. नी मला समजावून सांगितले की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी लघवी पिणे आवश्यक आहे. असं केल्याने कोणतीही समस्या येणार नाही. आणि काहीही होणार नाही. आधी स्वमूत्राचे सेवन करा. मद्यपान करणे थांबवा, मांसाहार खाऊ नका. तंबाखू खाऊ नका. सामान्य आहार घ्या. मात्र स्वमूत्र प्या.
मी त्यांना म्हटले ठीक आहे मी पिणार. मी स्वतःला या साठी तयार केले आणि बिअर सारखे  घोट घोट घेईन.मी असे 15 दिवस केले. 15 दिवसांनी एक्सरे रिपोर्ट आल्यावर डॉक्टर थक्क झाले. दुखापत बरी होण्यासाठी दोन ते अडीच महिने लागतात मात्र हा त्रास दीड महिन्यांतच पूर्ण बरा झाला. 
Edited By - Priya Dixit