शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (08:47 IST)

अभिनेता विकी कौशलला देशसेवेसाठी मिळाली मोठी संधी

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला देशाच्या संरक्षणार्थ दिल्या जाणाऱ्या सेवेत योगदान देण्याची संधी मिळाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवसांपूर्वीच विकीला एक मोठी संधी मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याविषयीची माहिती दिली. विकी येत्या काही दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेश येथील तवांग येथे असणाऱ्या भारत- चीन सीमेवर असणाऱ्या जवानांसोबत गस्त घालत त्यांच्यासोबत काही क्षण व्यतीत करणार आहे.
 
समुद्रसपाटीपासून जवळपास १४ हजार फूट उंचीवर देशसंरक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैन्यदलाच्या तुकडीसोबत वावरण्याची संधी मिळाल्याबद्दल विकीने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. ही पोस्ट सोबत जोडलेल्या फोटोमुळे आणखीन खास ठरत आहे. ज्यामुळे खऱ्याखुऱ्या सैनिकांच्या साथीने तो दिसत असून, दोन्ही हात जोडून तो भारत मातेच्या या शूरवीरांसमोर कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे.