शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (18:26 IST)

केरला स्टोरी' फेम अदा शर्मानं सादर केली मराठी कविता

केरला स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मा केरला स्टोरी नंतर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. तिचा द केरला स्टोरी या चित्रपटाने बॉक्सऑफिस वर धुमाकूळ केला. यंदाच्या वर्षी या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली असून ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. अली कडे तिने एक व्हिडीओ पोस्ट केले असून त्यात आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तिने या व्हिडिओमध्ये आपल्या चाहत्यांना शाळेत शिकवली कविता ऐकवली असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओवर भरभरून कॉमेंट्स करत आहे.   
 
 या व्हायरल व्हिडीओ मध्ये अदा शर्मा ने पोस्ट करत म्हटले आहे, इडली आणि चवळी  चटक नंतर लोकांच्या मागणीनुसार, शाळेत शिकलेली अजून एक मराठी कविता सादर करत आहे. कसं वाटलं ?  
 
सध्या अदा शर्माच्या या कवितेवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहे. सध्या अदा शर्माची ही कविता सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.  
 
या अभिनेत्रीने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1920’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने ‘हम हैं राही प्यार के’ ‘हर्ट अटॅक’, ‘हंसी तो फंसी’ ‘कमांडो-2’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूनिका साकारली आहे. 
 
Edited by - Priya Dixit