शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 7 नोव्हेंबर 2018 (00:15 IST)

अक्षरा हसन आली अडचणीत

अभिनेता कमल हसन हा काय कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता त्याला चर्चेत येण्याचे कारण असे की, त्याची मुलगी अक्षरा हसन हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात सुपरस्टार कमल हसन आणि सारिकाची छोटी मुलगी अक्षरा हसन अंडरगारमेंटध्ये दिसत असून सेल्फी घेताना दिसत आहे. हे फोटोज खूप प्रायव्हेट आहेत. परंतु खुद्द अक्षरा हसनने ते शेअर केलेले नसून ती सायबर क्राइमची बळी ठरली आहे. फोटो अ‍ॅक्ट्रेस दीवाना नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत. हे फोटोज रिअल आहेत की फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत, हे सांगणे कठीण आहे. अक्षराने 2015 मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन स्टारर 'शमिताभ'मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. चित्रपटात ती धनुषची प्रेयसी होती. 'शमिताभ'नंतर ती नसिरुद्दीन शहा यांचा मुलगा विवान शहाच्या अपोझि 'लाली की शादी में लड्डू दीवाना'मध्ये दिसलेली आहे. सुपरस्टार अजितकुमार स्टारर तमिळ मूव्ही 'विवेगम' मध्येही तिने स्पेशल रोल केलेला आहे. अक्षरा सध्या आपल्या वडिलांचा तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपट 'सुभाष नायडू'मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहात आहे.