गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (09:26 IST)

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला अक्षय कुमार उपस्थित राहणार का? प्राइवेट एयरपोर्टवर झाला स्पॉट

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे रवाना झाला आहे. अक्षय कुमार आणि कतरिनाची मैत्री हे बॉलिवूडमध्ये एक उत्तम उदाहरण मानले जाते. याशिवाय दोघांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या दोन्ही जोडीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेकदा हिट ठरले आहेत. याचा पुरावा म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला सूर्यवंशी चित्रपट, ज्यामध्ये दोघांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. 
लग्न अगदी खाजगी ठेवण्यात आले आहे 
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला अवघे काही तास उरले आहेत. 7 डिसेंबरपासून सुरू झालेल्या विवाह सोहळ्याचा आज तिसरा दिवस आहे. त्याचबरोबर आज सात फेरे घेऊन हे जोडपे कायमचे एकमेकांचे होणार आहेत. लग्न अगदी खाजगी ठेवण्यात आले आहे. ज्या गडावर लग्नसोहळा होत आहे, त्या गडावरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट आहे. लग्नस्थळी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. 
अक्षय कुमार विमानतळावर दिसला
त्याच वेळी, अक्षय कुमारबद्दल इन्स्टंट बॉलीवूडच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की 8 डिसेंबरच्या रात्री अक्षयला खाजगी विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, तो आज कतरिनाच्या लग्नात सहभागी होणार आहे. समोर आलेल्या फुटेजमध्ये अक्षय कुमार त्याच्या कारमध्ये जांभळ्या रंगाच्या हायनेकमध्ये बसलेला दिसत आहे.