गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (12:49 IST)

बजरंगी भाईजान 2 पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खान अभिनित चित्रपट बजरंगी भाईजान सुपरहिट झाला होता.या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 6  वर्षे  झाली.प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स दिला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती .सलमान खान ,करीना कपूर खान,नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बाल कलाकार म्हणून हर्षाली मल्होत्रा या चित्रपटात होते.या चित्रपटात हर्षालीने मुन्नी नावाचा एका मुक्या मुलीचा अभिनय केला असून तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली.आता या चित्रपटाचे सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
बजरंगी भाईजान ची कथा अतिशय भावनिक होती.या चित्रपटात पाकिस्तानातून एक मुलगी वाट चुकून भारतात येते आणि बजरंगी भाईजान म्हणजे सलमान ला भेटते.त्यानंतर मुन्नीला तिच्या कुटुंबा पर्यंत पोहोचण्याचा संपूर्ण प्रवास या चित्रपटात दाखवला आहे.प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप पसंत केले होते.
 
आता या चित्रपटाचे सिक्वल म्हणजे बजरंगी भाईजान 2 हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळत आहे.आणि प्रेक्षक या चित्रपटाला देखील भरभरून दाद आणि प्रेम देतील अशी अशा आहे.