रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (10:10 IST)

बिग बॉस मध्ये जाण्यापूर्वी सर्व प्रतिस्पर्धी क्वारंटाईन होणार, या तारेखाल शुरु होणार शो

बिग बॉस पर्व 14 अद्याप सुरु झाले नाही, परंतु शो ची आत्तापासूनच जोमानं चर्चा सुरु आहे. दररोज शो बद्दल काही न काही काही बातम्या येतच आहेत. आता अलीकडे एक नवीनच बातमी येत आहे की या शो मध्ये जाण्याच्या पूर्वी प्रत्येक प्रतिस्पर्धीचे किंवा स्पर्धकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार शो मध्ये येण्याऱ्या प्रत्येक स्पर्धकाला कोरोनाची चाचणी करवून घ्यावी लागणार आणि घरात येण्यापूर्वी क्वारंटाईन किंवा विलगीकरण करावे लागणार. वास्तविक सर्व स्पर्धकांना प्रीमियरच्या तारखेच्या पूर्वी स्पर्धकांना वेग वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच स्पर्धकांना 20 किंवा 21 सप्टेंबर पासून क्वारंटाईन राहावे लागणार. हे सर्व शो चे प्रीमियर होई पर्यंत क्वारंटाईनच राहतील.
 
सलमान खान 3 दिवसांपूर्वी प्रीमियर भागाचे चित्रीकरण करणार. सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार बिग बॉस 14 ऑक्टोबर पासून ऑन एयर होणार आहे. साधारणपणे शो चे प्रीमियर भाग एका दिवसापूर्वीच शूट केले जातात जेणे करून स्पर्धकांची माहिती लपविता येईल. पण यंदा या प्रीमियर भागांची शूटिंग तीन दिवस पूर्वीच होणार आहे. 
 
सूत्रांप्रमाणे सलमान खान यांना बिग बॉस पर्व 14 साठी 250 कोटी रुपये फी म्हणून दिली जात आहे. या पर्वासाठी सलमान आठवड्यातून एकवेळा शूटिंग करणार आणि दिवसात दोन भागाची शूटिंग केली जाणार असल्याचे समजत आहे. 12 आठवड्यांसाठी दररोजच्या भागाच्या सुमारे 10.25 कोटी फी दिली जाणार आहे.