रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (17:22 IST)

कॉमेडी थ्रिलर चित्रपट 'भूल भुलैया 2' या दिवशी होणार रिलीज

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा चित्रपट 'भूल भुलैया 2' च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून हा हॉरर कॉमेडी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नव्या रिलीज तारखेला थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. निर्मात्यांनी 20 मे 2022 रोजी 'भूल भुलैया 2' रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
याआधी बातमी आली होती की बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा चित्रपट 'RRR' रिलीज होणार होता त्याच दिवशी 'भूल भुलैया 2' चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हे दोन्ही चित्रपट 25 मार्चला प्रदर्शित होणार होते. मात्र, आता निर्मात्यांच्या घोषणेनंतर आता 'भूल भुलैया 2' आणि 'RRR'मध्ये टक्कर होणार नाही हे निश्चित झाले आहे. टी-सीरीजच्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टमध्ये, 'भूल भुलैया 2' 20 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
 
अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिकसह तब्बू आणि राजपाल यादव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु देशात कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे चित्रपटाचे शूटिंग वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. पण आता हा चित्रपट यावर्षी 20 मे रोजी रिलीज होणार आहे.

भूल भुलैया 2' हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'भूल भुलैया'चा सीक्वल आहे, या मध्ये अक्षय कुमार, विद्या बालन मुख्य भूमिकेत होते. अक्षय कुमारचा 'भूल भुलैया' हा चित्रपट मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता. 'भूल भुलैया'चे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले होते. त्याचवेळी, भूल भुलैया 2 चित्रपटाचा दिग्दर्शक अनिश बज्मी आहे.