रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (13:33 IST)

Dada Saheb Phalke Award:ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार

asha parekh
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2022 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. अशातच आशा पारेख यांनी अभिनयाच्या क्षेत्रातून निवृत्ती घेतली आहे.  60 आणि 70 च्या दशकात आशा पारेख यांचे नाव त्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये घेतले गेले. आपल्या काळात चित्रपटाच्या पडद्यावर राज्य करणाऱ्या आशा पारेख या सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्री होत्या. 1992 मध्ये त्यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.