बुधवार, 4 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (11:53 IST)

शहनाज गिलच्या वडिलांना जिवे मारण्याच्या धमक्या, यापूर्वीही हल्ला झाला होता

बिग बॉस फेम आणि अभिनेत्री शहनाज गिलचे वडील संतोख सिंग यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शहनाजच्या वडिलांना शुक्रवारी रात्री उशिरा अज्ञात मोबाईल नंबरवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे.
 
 वृत्तानुसार, त्यांना फोन करणाऱ्या आरोपीने दिवाळीपूर्वी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबतची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. याआधीही जंदियाला गुरु परिसरात दोन दुचाकीस्वार तरुणांनी संतोख सिंग यांच्या कारवर गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
 
संतोख सिंह यांनी सांगितले की, शुक्रवारी ते काही कामासाठी तरनतारनला जात होते. दरम्यान, त्यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. फोन करणाऱ्याने दिवाळीपूर्वी जीवे मारण्याची धमकी दिली. फोन करणार्‍याने त्यांना गोळ्या घालून ठार मारणार नाही, तर तुकडे तुकडे करू अशी धमकी दिली.
 
सन 2021 मध्ये संतोख सिंह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, त्यानंतर 25 डिसेंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी दिली होती. हल्लेखोरांनी संतोख सिंग यांच्यावर जवळून गोळीबार केला होता.

Edited by : Smita Joshi